Skip to main content

Posts

Featured

चंचुप्रवेश: भाग १

" दरवर्षी एवढी मुलं शाळा सोडतात की शिक्षक त्यानेच हैराण होतात . मुलींना पैशाअभावी शाळा सोडावी लागते . त्यांची तर आजही १५ - १६ व्या वर्षी लग्न लावून दिली जातायत . मुलांचंही तेच होतं . इंग्रजी समजत नाही , गणित कळत नाही म्हणून स्वतःचीच लाज वाटून मुलं शाळेपासून दुरावतात . अशी मुलं मग घरातून निघतात आणि शाळेत येण्याच्या ऐवजी डोंगरातल्या रानात पळतात . शाळेत त्यांचे एकामागून एक खाडे होत राहतात . एक विद्यार्थी शाळेपासून दूर होताना एकटाच होत नाही तर इतरही विद्यार्थ्यांना तो आकर्षित करून घेउन जातो . कधीकधी फारच गैरहजेरी वाढल्यावर शिक्षक त्यांच्या गावात जातात तेव्हा अगोदरच बातमी लागून ही पोरं दूर डोंगरात पळतात . शिक्षकांनी तरी काय करावं मग ? बाकी महाविद्यालयीन शिक्षणापासून तर इथले विद्यार्थी फारच दूर आहेत . त्याबद्दल न बोललेलंच बरं …." चार वर्षांपूर्वी पालघर तालुक्यामधल्या एका शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापकांच्या घरी आम्ही बसलो होतो . तेव्हा पाड्यावरच्या विद्यार्थ्य

Latest Posts